चिकित्सक समूह आणि पाटकर - वर्दे महाविद्यालयाविषयी

४ नोव्हेंबर १९०६ रोजी चिकित्सक समूह हि संस्था स्थापन करण्यात आली . विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, विविध विषयांवर सांगोपांग चर्चा व परिचर्चा आयोजित करावी तसेच लोकांना वैद्यकीय मदत मिळावी हा संस्था स्थापनेमागचा मुख्य उद्देश्य होता .

आपल्या संस्थेचे एक महाविद्यालय असावे , हे उराशी बाळगलेले स्वप्न कै . सर सीताराम पाटकर यांच्या वारस कै . श्रीमती मोतीबेन दळवी यांनी गोरेगाव येथील अतिशय उपयुक्क्त असा भूखंड उदारहस्ते देणगी म्हणून दिल्याने साकार झाले . १९६४ साली पाटकर महाविद्यालयाची स्थापना करून उच्च शिक्षणाच्या विस्तृत क्षेत्रामध्ये प्रवेश केला .

मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये चिकित्सक समूहाचे कला , विज्ञान व वाणिज्य शाखा असलेले पाटकर - वर्दे महाविद्यालय सुप्रसिद्ध (ख्यातकीर्त ) आहे . २००९-२०१० मध्ये 'राष्ट्रीय मूल्यांकन एवं प्रत्यायन परिषदे'तर्फे आमच्या महाविद्यालयांना 'अ' श्रेणी प्रदान करण्यात आली आहे .

पदवीपूर्व , पदव्युत्तर आणि पी . एच . डी . सारख्या अभ्यासक्रमांच्या विस्तृत मालिकेबरोबरच आमच्या महाविद्यालयात बायोटेकनॉलॉजी , मायक्रोबायॉलॉजी , एव्हिएशन , कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेकनॉलॉजी मध्ये बी . एस . सी . , बी .एम .एस . , बँकिंग अँड इन्शुरन्स किंवा अकाउंटिंग अँड फायनान्स मध्ये बी .कॉम ., बी .एम . एम . तसेच कॉम्प्युटर सायन्स , इन्फॉरमेशन टेकनॉलॉजी ,मायक्रोबायॉलॉजी, बायोटेकनॉलॉजी किंवा बायोइन्फॉर्मटिक्स मध्ये एम . एस . सी . सारखे नवनवीन कालानुरूप शिक्षणक्रमही महाविद्यालयात शिकवले जातात .

माननीय कॉलेज अध्यक्ष संदेश


प्रिय विद्यार्थी,


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे , ही चिकित्सक समुहाची फार पूर्वीपासूनची मनीषा होती . या जिल्ह्यातील मुलांना पारंपरिक विद्यापीठांकडून एम . बी .ए , बी .सी .ए . यांसारखे जे अभ्यासक्रम दिले जात नाहीत , ते आम्ही त्यांना उपलब्ध करून देत आहोत . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०वी च्या विद्यार्थ्यांना तुटवडा नाही हे उघडच आहे . या विदयार्थ्यांना उच्च शिक्षणात तरबेज करणे हेही चिकित्सक समूहाचे एक स्वप्न आहे . आमच्या संस्थेतर्फे मुंबईत 'अ' श्रेणी प्राप्त झालेले मुंबईतील पाटकर - वर्दे महाविद्यालय चालवले जाते . हे महाविद्यालय सर्वोत्कृष्ठ अध्यापन आणि बुद्धिमान विद्यार्थ्यांचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे. चिकित्सक समूहाच्या बहुपयोगी शिक्षण केंद्रात कुडाळ आणि पूर्व पिढ्या ज्याच्यापासून वंचित राहिल्या त्या गोष्टी त्यांना साध्य करता येतील . भासमान वर्गाच्या साहाय्याने आम्ही विद्यार्थ्यांना उत्कृष्ट तेच देऊ शकू, असा आमचा विश्वास आहे . 'कोंकण - वृद्धी- कोंकणसमृद्धी' या आमच्या मोहिमेच्या साहाय्याने नजीकच्या भविष्यकाळात इतर विविध समाजाच्या नाविन्यपूर्ण संकल्पना प्रदान करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत .


प्रेमाने,

Shri. K.V.Rangnekar