ग्रामीण भागात पावसाचे पाणी साठविण्याकरीता कार्यशाळा

चिकित्सक समूहाचे बहुपयोगी शिक्षणकेंद्र, कुडाळ आणि जलवर्धिनी प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागात पावसाचे पाणी साठविण्याकरीता कार्यशाळा दि. ८ व ९ एप्रिल २०१७ रोजी सकाळी १०. ३० ते सायं. ०४. ०० वाजता आयोजित करण्यात आली होती .

या कार्यशाळेचे उद्घाटन जलवर्धिनी प्रतिष्ठानचे जलतज्ञ व विश्वस्त मा . श्री . उल्हास परांजपे यांच्या हस्ते झाले . या वेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक, संगणकशास्त्र विद्याशाखेचे प्रभारी संचालक मा . श्री . माधव पळशीकर, सौ. परांजपे, भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, चिकित्सक समूहाचे बहुपयोगी शिक्षणकेंद्राचे केंद्रसंयोजक श्री . राजेंद्र चव्हाण, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

श्री . उल्हास परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ तालुक्यातील हुमरमला भाक्राड येथे पाणी साठवण टाकीचे प्रात्यक्षिक केले. यामध्ये फेरोसिमेंटच्या ५ हजार व ९ हजार लिटर पाण्याची साठवण क्षमता असणाऱ्या पाणी साठवण टाक्या बांधण्यात आल्या. ​